“पालघर कनेक्ट” उपक्रमांतर्गत सफाळे पोलीसांचा जनजागृती कार्यक्रम
पालघर / नवीन पाटील
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहिदास गार्डन हॉल येथे शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी “पालघर कनेक्ट” या उपक्रमांतर्गत नागरिकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध शासकीय सेवा, जनजागृती आणि सामाजिक भान या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सफाळे पोलिसांकडून केलेल्या मार्गदर्शनात नागरिकांना आपले सरकार पोर्टलवरील सर्व सुविधा व त्या कशा प्रकारे सहज उपलब्ध होऊ शकतात याची माहिती देण्यात आली. आयजीपी, कोकण रेंज यांच्या अधिकृत “समुद्र संदेश” या चॅनलबद्दल माहिती देऊन नागरिकांना तो फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले.
“पालघर पोलीस व्हाट्स अप चॅनेल” याबाबत माहिती देऊन नागरिकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच https://palgharpolice.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरील सर्व टॅब्स व त्यांचा उपयोग नागरिकांसमोर सविस्तर समजावून सांगण्यात आला.
वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करताना, फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे मार्गदर्शन केले गेले. तसेच अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम समजावून देत, त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन सफाळे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी उपस्थित नागरिकांना केले.
कोट…
हा उपक्रम नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्था, डिजिटल सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला.
– सपोनि, दत्ता शेळके सफाळे पोलीस स्टेशन.