मानपाडा पोलिसांची तत्पर कामगिरी; ८.५ तोळे सोन्याचे दागिने शोधून तक्रारदारास परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : मानपाडा पोलिस ठाण्याच्या दक्ष व जबाबदार कार्यामुळे तक्रारदार महिलेचे उबेर (एमएच ४७ बीएल ५०६५) मध्ये विसरलेले सुमारे ८.५ तोळे सोन्याचे दागिने – मंगळसूत्र, बांगड्या, हार, नथ – तसेच महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित परत मिळाली.
या प्रकरणी सपोनि चव्हाण व पो.ह. खिळारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा राठोड, पोशि सांगळे, पोशि गायकर व तपास पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली. उबेर चालकाचा शोध घेऊन दागिने तक्रारदार महिलेच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले.
सतर्कता, प्रामाणिकपणा आणि जनतेचा विश्वास या आधारे मानपाडा पोलिसांनी दाखवलेली ही तत्पर कामगिरी सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.