कोनगाव पोलिसांचा पराक्रम! हरवलेले ज्येष्ठ नागरिक सुखरूप सापडले
पोलीस महानगर नेटवर्क
कोनगाव – कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मानव मिसिंग रजि. क्र. ४४/२०२५ अन्वये हरवलेले कृष्णा विठ्ठल शिंदे (वय ६२) यांचा शोध कोनगाव पोलिसांनी यशस्वीपणे लावला आहे.
शिंदे हे हरवल्याची तक्रार दाखल होताच कोनगाव पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. अखेर पोलिस पथकाला कृष्णा शिंदे हे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुखरूप अवस्थेत सापडले.
हरवलेल्या व्यक्तींचा शोध लावण्यात यश मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी कोनगाव पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या तत्पर कार्याची दखल घेत प्रशंसा व्यक्त केली आहे.