गणेशत्सवादरम्यान रात्रीपर्यंत गणपतीसमोर नाचत असलेल्या मित्रांमध्ये किरकोळ वाद; काही वेळातच मित्राची धारदार शास्त्राने हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून खुनाचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या घटनेने जिह्यातील नागरिकात तणाव निर्माण झाला आहे. गौरी गणपतीच्या निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र उत्सवादरम्यान जिल्ह्यात मनाला वेदना देणाऱ्या घटना घडत आहेत. बीड शहराला हादरून टाकणारी आणखी एक घटना बीड शहरात मध्यरात्री घडल्याचे समोर आली होती. ज्याच्यावर विश्वास होता. त्याच मित्राने मित्राचा धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाचा खून झाल्याची घटना मध्यरात्री उशिरा शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली होती या घटनेने देखील मैत्रीच्या नात्यावर प्रश्न उपस्थित झालेय.
बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करून एका २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला होता. मित्रांत किरकोळ वाद झाला आणि मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणातील आरोपी मात्र जाग्यावरून फरार झाला होता. ज्या मित्रावर या आरोपीने हल्ला केला होता, त्याला रक्ताच्या थारोळ्यात मरण्यासाठी सोडून मित्र फरार झाला होता. अखेर या फरार आरोपी मित्राला पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मध्यरात्री दोन वाजता विजय काळे हा गल्लीत बसवलेल्या गणपतीच्या समोर मित्रांसोबत नृत्य करत होता, त्याने त्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला होता. मात्र थोड्याच वेळात मित्र अभिषेक गायकवाड याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. आरोपी अभिषेक याने विजयच्या छातीत धारदार शस्त्र घुसवले. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला होता. मयत विजयने पोस्ट केलेला त्याच्या नृत्याचा व्हिडिओ हा शेवटचा व्हिडिओ ठरला. घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. तो एका डोंगरात लपून बसल्याची माहिती बीड येथील शिवाजीनगर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार मयत विजय काळे हा देखील गुन्हेगारी स्वरूपाचा होता, त्याच्यावर बीड सह राज्यभरात अनेक पोलिसात विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.