रील बघून ओळख, लव्ह मॅरेजनंतरही चारित्र्यावर संशय; भिवंडीत पतीने आपल्याच पत्नीला संपवलं, आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका प्रेम कहाणीचा भयानक अंत झाला आहे. २५ वर्षीय तरूणाने २२ वर्षीय तरुणीचा धारधार शस्त्रानं शिरच्छेद करून शिर धडा वेगळ करून टाकून दिलं. हे दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमीच वाद घाऊन आपल्याच पोटच्या चिमुकल्याला मारहाण करीत असल्याच्या वादातून तरुणांने तरुणीची क्रूर पणे हत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. मात्र आरोपीने हत्येची कबुली दिली असून हत्येचे कारण देताना तो उडवा उडवीचे उतर देत असल्यान हत्येचे ठोस कारण समोर आलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी प्रियकर तरुणाला अटक केली आहे. मोहम्मद उर्फ सोनू इम्तियाज अन्सारी असे अटक आरोपीच नाव आहे. तर परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद उर्फ सोनू इम्तियाज अन्सारी (२२) असे क्रूरपणे हत्या झालेल्या तरुण प्रेयसीचं नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मुस्कान आणि आरोपी तहा दोघेही भिंवडी शहरातील एका वस्तीत राहत होते. आरोपी हा ट्रक चालक असून मृत मुस्कान ही रील बनवून सोशल मीडियावर टाकत असतानाच दोघांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. याच ओळखीतून प्रेमात रुपांतर होऊन दोघेही सारखे राहत असतानाच दोघांनी प्रेम विवाह केला. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाल्यानं आपण वेगळं राहू म्हणून मृतकने आरोपीकडे तगाद लावल्यान त्याने भिवंडी शहरातील खाडी लगतच्या २० मीटरअंतरावर ईदगाह परिसरात खोली भाडयान घेऊन दोघेही एक वर्षाच्या मुलासह राहत होते. त्यातच दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत वाद होऊन आपल्याच चिमुकल्याला मारहाण करीत होती. याच वादातून नेहमीच दोघांत भांडणे होत होते.
दरम्यान इदगाह झोपडपट्टी जवळील खाडी लगतच्या दलदलीत ३० ऑगस्ट रोजी धडा वेगळे महिलेचे शिर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. तर महिलेची ओळख पटवणे व त्यानंतर हत्येचा आरोपी पकडणे असे मोठे आव्हान भोईवाडा पोलिसांसमोर होते. भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांसह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद कुंभार व त्यांच्या पोलिस पथकातील पोलिसांनी ईदगाह झोपडपट्टीत माहिती घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये येथील एक महिला दिसत नसल्या बद्दल माहिती समोर आली.त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करीत चौकशीस सुरवात केली. त्यामध्ये परवीन उर्फ मुस्कान या महिलेचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस तपासात माहिती समोर आली असता तिचा चालक पती घरी नसल्याचे आढळून आले.पोलिसांनी शोध घेत त्यास १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर पती तहा याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे.पोलिसांनी त्यास घटनास्थळी नेऊन हत्या केलेल्या पत्नीचे धड कोठे आहे त्याबाबत शोध घेण्यासाठी खाडी पात्रात बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. दोघा एकमेकांवर चारित्र्यावर संशया वरून वाद होत असत. त्यामुळे त्यांच्यात हाणामारी सुद्धा होत असे.त्यातून परवीन ही २८ ऑगस्ट रोजी सुद्धा घरातून निघून गेली होती. त्यातून वाद झाला होता त्या रागातून पती तहा इम्तियाज अन्सारी याने २९ ऑगस्ट रोजी पत्नी परवीन हिची क्रूरपणे हत्या केली. त्यावेळी त्याने पत्नीचे शिर धडापासून वेगळे करीत शरीराचे दोन तुकडे करीत ते खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.