येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैदी महिला रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैदी महिला रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – परभणी न्यायालयाच्या आदेशाने येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैदी महिला रुग्णाने अंगातील कपड्यांची दोरी करून खिडकीला बांधून घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी ही घटना घडली. लक्ष्मी अशोककुमार (४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मी परभणी कारागृहात शिक्षा भोगत होती. तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने कारागृहाने तिच्यावर उपचाराची गरज असल्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. परभणी न्यायालयाच्या आदेशाने लक्ष्मीला ३१ जुलै रोजी येरवडा मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.

बुधवारी लक्ष्मी वार्डात असताना अंगावरील कपडे काढून तिने त्याची दोरी तयार केली. ती दोरी खिडकीला बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. महिला रुग्णाने गळफास घेतल्याचे समजताच डॉक्टरांचे पथक धावत वॉर्डात गेले. वैद्यकीय तपासणी केली असता ती मृत झाली होती. प्रशासनाने तातडीने येरवडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्ण वॉर्डात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा घटना थांबलेल्या नाहीत. गेल्या महिन्यात १० ऑगस्ट रोजी खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगणाऱ्या अडरट्रायल मनोरुग्ण कैद्याने पायजमाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे रुग्णांची सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon