ठाण्यात फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सायकलिंग रॅलीचे आयोजन; नागरिक व पोलीस दलाचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : भारत सरकारच्या “फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे शहरातील नागरिकांच्या संयुक्त सहभागातून भव्य सायकलिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता साकेत मैदानातून ही रॅली सुरु होणार असून, ठाण्यातील नागरिक व पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” हा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणे हा आहे.
रॅलीचे मार्ग
१० किमी सायकल रॅली मार्ग :
साकेत मैदान – आम्रपाली हॉटेल – तिन पेट्रोल पंप – हरी निवास – नितीन जंक्शन – कॅडबरी – साकेत मैदान – क्रिकनाका कोर्ट नाका – चिंतमणी चौक – दगडी शाळा – राम मारुती रोड – गजानन चौक – एलबीएस रोड – तिनहात नाका ब्रिज – माजिवाडा वाय जंक्शन – साकेत कट – महालक्ष्मी मंदिर – साकेत सोसायटी – साकेत मैदान (समाप्त).
२५ किमी सायकल रॅली मार्ग :
साकेत मैदान – क्रिकनाका कोर्ट नाका – चिंतमणी चौक – आम्रपाली हॉटेल – दगडी शाळा – राम मारुती रोड – गजानन चौक – हरी निवास – एलबीएस रोड – नितीन जंक्शन – कॅडबरी – रेमण्ड स्कूल – वर्तकनगर – शास्त्रीनगर – शिवाई नगर – उपवन तलाव – गावंडबाग – बिरसा मुंडा चौक – काशिनाथ घाणेकर चौक – खेवरा सर्कल – निळकंठ बंगले चौक – मुल्ला बाग – घोडबंदर रोड – ब्रम्हांड – पातलीपाडा – मानपाडा – कापूरबावडी – माजिवाडा – साकेत कट – महालक्ष्मी मंदिर – साकेत सोसायटी – साकेत मैदान (समाप्त).
आवाहन
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी ठाणेकरांना आवाहन केले आहे की, “या उपक्रमात ठाणे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी या रॅलीतून प्रेरणा घ्यावी.” या रॅलीमुळे पोलीस दल आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ होणार असून, फिटनेसच्या माध्यमातून आरोग्यदायी ठाणे उभारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.