ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली बेकायदेशीर धंदा!
रिकीज बार अँड किचनवरून ठाण्यात खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – हिरानंदानी इस्टेट, सोलस बिल्डिंगमधील रिकीज बार अँड किचन या रेस्टॉरंटवर बेकायदेशीर कारभाराचे गंभीर आरोप झाले आहेत. शासनाच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन करत येथे अनधिकृत बार, DJ पार्टी, मद्यविक्री व अश्लील वातावरण तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाचा खेळखंडोबा
दुकाने एकत्र करून बेकायदेशीर विस्तार
पहिल्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम
रस्त्याच्या फूटपाथ व मार्जिन स्पेसवर अतिक्रमण
DJ साऊंडसह भव्य पार्टी; महापालिकेच्या डोळ्यांआड
प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांचा आदेश – “दोन दिवसांत बांधकाम काढा” – पण मालकांचा सरळ अवमान!
🍷 महिलांसाठी ‘फ्री ऑफर’ – अल्पवयीनांनाही प्रवेश?
📍 दर बुधवारी महिलांसाठी विशेष स्कीम
महिलांना मोफत एन्ट्री
दर तासागणिक मद्य पेय मोफत
सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती
अल्पवयीन मुलामुलींना आमिष दाखवल्याची शंका
पालक वर्गात या प्रकारामुळे तीव्र संतापाची लाट!
शासन महसूल बुडवणारी यंत्रणा
कोणतीही अबकारी परवानगी नाही
नगररचना कायदा १९६६ व महापालिका कायदा १९४९ चा भंग
उत्पादन शुल्क व पोलिसांचे दुर्लक्ष
शासन महसुलाला मोठा फटका
“अबकारी कायद्याचा भंग म्हणजे थेट गुन्हा” – कायदे तज्ज्ञ
‘दैनिक पोलीस महानगर’ची पुढाकाराने धडक कारवाईची मागणी
मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री (उत्पादन शुल्क), जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक श्री. खिल्लारे यांची प्रतिक्रिया :
> “बेकायदेशीर ऑनलाईन बुकिंग व मद्यपान करणाऱ्या ग्राहकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
❓ कायदाचं राज्य प्रस्थापित होणार की लाचखोरीचा बाजार?
अधीक्षक प्रवीण तांबे व निरीक्षक खिल्लारे यांच्याकडे ठाणेकरांची नजर
प्रशासनाची कारवाई होते की पुन्हा “मुक्काम पोस्ट दुर्लक्ष” हा प्रश्न
⚠️ ठळक मुद्दा
रिकीज बार अँड किचन हे केवळ खानपान केंद्र नसून बेकायदेशीर धंद्याचे अड्डे बनले आहे.
👉 शासन महसूल वाचवण्यासाठी, तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी तातडीने कठोर कारवाई आवश्यक आहे.
अन्यथा संपूर्ण परिसरात गुन्हेगारीचे सावट गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.