सायबर फसवणुकीतील ₹२,१०,५०० रक्कम परत मिळवण्यात पालघर पोलिसांचे यश

Spread the love

सायबर फसवणुकीतील ₹२,१०,५०० रक्कम परत मिळवण्यात पालघर पोलिसांचे यश

पालघर / नवीन पाटील

बोईसर एमआयडीसी येथील एका कंपनीची सायबर फसवणूक करून काढलेली एकूण ₹२,१०,५००/- रक्कम पालघर पोलिसांनी १००% परत मिळवण्यात यश मिळवले. बोईसर पोलिस ठाणे व सायबर पोलिस ठाण्याच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली. ३ जुलै २०२५ रोजी कंपनीच्या वॉट्सअॅपवर “ नोटीस ऑफ डिस्कनेक्शन” असा मेसेज पाठवून, “आज रात्री पाणी कनेक्शन तोडण्यात येईल” असे सांगून वॉटर बिल अपडेट – १. एपीके नावाची फाईल डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्या फाईलद्वारे बँक अकाउंटची माहिती मिळवून, आरोपींनी कंपनीच्या खात्यातून ₹२,२०,४००/- रक्कम ट्रान्सफर केली.

तक्रार मिळताच पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या पथकाने तात्काळ आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधून व्यवहार थांबवला. सायबर पोलीस ठाण्याने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर नोंदणी करून व्यवहार होल्ड केला व पूर्ण रक्कम कंपनीच्या खात्यात परत आणली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच बोईसर व पालघर सायबर पोलिस पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon