मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाद्वारे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; देह व्यापार रॅकेटमधून एका १२ वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका

Spread the love

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाद्वारे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; देह व्यापार रॅकेटमधून एका १२ वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका

योगेश पांडे / वार्ताहर 

वसई – मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर येत आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने दिनांक २६ जुलै रोजी वसईतील नायगाव येथे एनजीओच्या मदतीने देह व्यापार रॅकेटमधून एका १२ वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका केली होती. दरम्यान, रेस्क्यू होताच तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने आणि एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने २६ जुलै रोजी ही कारवाई केली. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. या अल्पवयीन पीडितेने एनजीओ ना दिलेल्या जबानीत भयानक हकिकत समोर आली, केवळ तीन महिन्यांत तिच्यावर २०० हून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले आहेत.

एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही एक शाळकरी विद्यार्थी आहे. एका विषयात ती नापास झाली, त्यावेळी आई वडील मारतील किंवा ओरडतील या भीतीपोटी तिने घर सोडलं. एका ओळखीच्या महिलेने तिला आधी कलकत्त्यात आणल. तिथे तिचे फेक डाक्युमेंट बनवले. त्यानंतर गुजरातच्या नाडियाड येथे आणलं, तेथे एका वृध्द व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले, तिचे अश्लिल फोटो काढले आणि त्यानंतर ब्लॅकमेल करुन, तिला देहव्यापारात ढकळलं. श्याम कांबळे पुढे म्हणाले की, तिला मुंबईला आणण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार करण्यात आले. अद्याप किशोरावस्थेत न पोहोचलेल्या त्या निरागस मुलीला देह व्यापारातील राक्षसांनी तिचे बालपण हिरावून घेतले. एन.जी.ओ. आणि पोलिसांनी रेस्क्यू केल्यानंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाळ कल्याण सिमीतीच्या ताब्यात दिलं आहे. तिथे तिच्यावर समुपदेशन करण्यात येत आहे. याप्रकरणात तपास सध्या नायगाव पोलीस करत आहे. त्यांनी आतापर्यंत यात ९ आरोपींना अटक केली आहे. त्यात दोन महिला आणि सात पुरुष दलाल आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करुन, त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्याची मागणी एन.जी.ओ. नी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon