हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश : रक्षाबंधन सोहळ्यात भगिनींची परस्परांना राखी
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात हिंदू व मुस्लिम भगिनींनी परस्परांना राखी बांधून एकमेकांच्या सुरक्षेची आणि प्रेमाची हमी दिली.
या उपक्रमातून जातीय सलोखा, बंधुत्व आणि परस्पर सन्मानाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.