कल्याण परिमंडळ ३ मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजाची विक्री रोखण्यासाठी मोठी कारवाई; तीन आरोपी अटकेत

Spread the love

कल्याण परिमंडळ ३ मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजाची विक्री रोखण्यासाठी मोठी कारवाई; तीन आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

 

कल्याण : परिमंडळ ३ कल्याणमधील अंमली पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांच्या विशेष कारवाई पथक आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजासारखे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

पहिली कारवाई – एम.डी. ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

दि. १८ जुलै २०२५ रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत, फोर्टीस हॉस्पिटल समोर, ए.पी.एम.सी मार्केटच्या पाठीमागील रस्त्यावर पोलिसांनी गस्त घालतानाच दोन तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण ११० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ सापडला. त्याची अंदाजे बाजारमूल्य रु. २२ लाख इतकी आहे.

अटक आरोपींची नावे:

१) मोहम्मद कैफ मन्सुर शेख (२४) रा. मेहेक मंजील, बैलबाजार, कल्याण (प.)
२) फरदीन आसीफ शेख (२४) रा. डिम कॉम्प्लेक्स, कोनगांव, भिवंडी. या प्रकरणी गु.र.नं. ४३७/२०२५ नुसार एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

दुसरी कारवाई – गांजासह एकजण गजाआड

दि. १७ जुलै २०२५ रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, योगीधामजवळ साई दर्शन ढाब्याजवळ, वालधुनी नदीकाठी, पोलिसांनी एका व्यक्तीला गांजाची विक्री करताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे १.१२० किलो गांजा सापडला ज्याची अंदाजे किंमत रु. २५,०००/- आहे.

अटक आरोपीचे नाव:

रवि शिवाजी गवळी (३०), रा. अनुपमनगर, जयदुर्गे चाळ, खडकपाडा, कल्याण (प.) या प्रकरणी गु.र.नं. ५९८/२०२५ नुसार एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब), गा(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

परिमंडळ ३ कल्याण पोलिसांची ही संयुक्त कारवाई अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचा स्पष्ट इशारा देते. विशेष कारवाई पथक व स्थानिक पोलीस ठाण्यांची समन्वित कामगिरी भविष्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी ठरत आहे. अंमली पदार्थविरोधी अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon