घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक; १९.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त – गुन्हे शाखा घटक-४, उल्हासनगरची उल्लेखनीय कामगिरी

Spread the love

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक; १९.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त – गुन्हे शाखा घटक-४, उल्हासनगरची उल्लेखनीय कामगिरी

उल्हासनगर – ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बदलापूर परिसरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ च्या पथकाने अटक करून तब्बल १९.८१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरट्याने वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण ८ गुन्हे उघड केले आहेत. दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, घटक-४ यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे केला. पोलीस हवालदार गणेश गावडे यांना मिळालेल्या माहितीवरून, रोशन बाळा जाधव (वय ३४, रा. निळजेगाव, डोंबिवली पूर्व) या संशयिताला उल्हासनगर-१ येथून ताब्यात घेण्यात आले.

अटक आरोपीकडून १५,१३,३६० रुपये किमतीचे १८९.१७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १०,००० रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ८०,००० रुपये किमतीचे दोन लॅपटॉप, ५०,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन व ३,२८,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण जप्त मुद्देमाल: १९,८१,३६० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या अटकेनंतर खालील ८ गुन्हे उघडकीस आले आहेत:

१. बदलापूर पश्चिम पो.स्टे. गु.र.नं. २५४/२०२५
२. बदलापूर पूर्व पो.स्टे. गु.र.नं. ३९१/२०२५
३. बदलापूर पूर्व पो.स्टे. गु.र.नं. २५७/२०२५
४. बदलापूर पूर्व पो.स्टे. गु.र.नं. ३७०/२०२५
५. बदलापूर पूर्व पो.स्टे. गु.र.नं. २२९/२०२५
६. बदलापूर पूर्व पो.स्टे. गु.र.नं. ३७१/२०२५
७. बदलापूर पूर्व पो.स्टे. गु.र.नं. ३०७/२०२५
८. शिवाजीनगर पो.स्टे. गु.र.नं. ४७८/२०२५

ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध – १) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास व कारवाईसाठी पुढील अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सपोनि श्रीरंग गोसावी, पो.ह.वा. गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव, पो.ना. कुसुम शिंदे, विक्रम जाधव, पो.शि. संजय शेरमाळे, अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले (सर्व गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर).

पोलीस तपास कौशल्य, तांत्रिक विश्लेषण आणि सततच्या गुप्त माहिती संकलनामुळे, एका सराईत गुन्हेगाराच्या अटकेने अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon