पंढरीच्या दर्शन रांगेतील वारकऱ्याला सुरक्षा रक्षकाची काठीनं बेदम मारहाण, वारकारी समाजात तीव्र संतापाची लाट
योगेश पांडे / वार्ताहर
पंढरपुर – पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेड दर्शन बारीमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागपूर येथील एका भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार सकाळच्या सुमारास घडला असून भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तांची मोठी गर्दी आहे. पालख्यांचे आगमन झाल्याने मंदिर परिसरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रीघ आहे. मंदिर समितीने दर्शनासाठी रांगेची सोय केली असली तरी सुरक्षारक्षक किरकोळ कारणावरून मुजोरी करत असल्याचं दिसत आहे . विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागपूरच्या वारकऱ्याला सुरक्षारक्षकाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. भाविकांना झालेल्या मारहाणीमुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय .
पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेड दर्शन बारीमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागपूर येथील भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. घटना सकाळच्या सुमारास घडली. घटनेनंतर भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून दोषी सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी होत आहे. सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भाविकाला झालेल्या मारहाणीमुळे दर्शनासाठी आलेल्या इतर भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान, मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी बीव्हीजी कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक देशमुख यांनी संबंधित सुरक्षारक्षकाला माफी मागण्यास सांगून नोकरीवरून काढल्याचे समजतेय. आता मंदिर समिती यावर काय कारवाई करणार, याकडे सर्व वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दिंडीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले असून अशा प्रकारच्या घटना प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.