संदीप माळवी यांच्याकडे एसआरएचा प्रभारी पदभार; पराग सोमण यांच्या बदलीमुळे पद झाले होते रिक्त

Spread the love

संदीप माळवी यांच्याकडे एसआरएचा प्रभारी पदभार; पराग सोमण यांच्या बदलीमुळे पद झाले होते रिक्त

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे – ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे. पराग सोमण यांची वर्धा येथे बदली झाल्यामुळे हे पद काही काळ रिक्त होते. माळवी यांनी गुरुवारी हा पदभार स्वीकारत विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. झोपडपट्टीतील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरुवातीला केवळ मुंबई शहरापुरती मर्यादित होती. मात्र, मागील काही वर्षांत ठाणे आणि त्यापलिकडच्या परिसरात झपाट्याने नागरीकरण झाल्यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढली. त्यामुळे मुंबई शहर वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यात आली.

या विभागाच्या सीईओ पदाचा प्रथम अतिरिक्त पदभार १८ सप्टेंबर २०२० रोजी सतिश लोखंडे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर ८ ऑगस्ट २०२३ रोजी पराग सोमण यांची नियुक्ती झाली. परंतु अलीकडेच त्यांच्या वर्धा बदलीच्या आदेशांनंतर हे पद रिक्त राहिले होते. या पार्श्वभूमीवर, आता संदीप माळवी यांच्याकडे हे महत्त्वाचे जबाबदारीचे पद देण्यात आले असून, त्यांनी प्रभारी पदभार स्वीकारताच विभागीय कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon