प्रतिबंधित खैर लाकूड वाहतूक प्रकरणी ट्रकसह एक जण अटकेत; ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

प्रतिबंधित खैर लाकूड वाहतूक प्रकरणी ट्रकसह एक जण अटकेत; ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे – वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनिट ५च्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खैराच्या प्रतिबंधित लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत ४१ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका इसमाला अटक करण्यात आली आहे. दि. १७ जून २०२५ रोजी पहाटे १ वाजता नितीन नाका मार्गे माजिवाडाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक (क्र. जीजे १५ वायवाय ५६५२) वर वागळे गुन्हे शाखेने सापळा रचत कारवाई केली. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये १०.५ टन वजनाची, अंदाजे ३१,७२,५००/- रुपये किंमतीची प्रतिबंधित खैर लाकडाची ओंडके आढळून आली. ट्रकसह एकूण ४१,७५,५००/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

याप्रकरणी ट्रकचालक अनिलकुमार रामचंद्र गुप्ता (वय ५४, रा. साईदर्शन कॉलनी, धुळे) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५२/२०२५ भारतीय दंड संहिता कलम ३०३(२), ३(५), तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कलम ४१(ब), ४२, ५२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोउपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पो. आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पो. नि. सलील भोसले, सपोनि शरद पाटील व त्यांच्या पथकातील पोहवा पालांडे, निकम, तारी, पोना ठाणेकर, पोशि शिकारे व पो. ७५४ यादव यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास वागळे युनिटचे सहा. पो. नि. श्री. शरद युवराज पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon