ट्रेनमधून उतरताना मान लोखंडी कुंपणात अडकली; मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

ट्रेनमधून उतरताना मान लोखंडी कुंपणात अडकली; मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईत रोज लाखो प्रवासी मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतात. लोकल प्रवासामध्ये अनेक अपघाताच्या घटनाही घडत असतात. अशाच एका अपघातातपश्चिम रेल्वेवर एका प्रवाशाचा वेदनादायक मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या एका प्लॅटफॉर्मवर ही दुःखद घटना घडली.चुकीच्या बाजूने लोकल ट्रेनमधून उतरताना एका २७ वर्षीय तरुणाची मान लोखंडी कुंपणात अडकल्याने मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल या स्थानकावर सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही घटना घडली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल स्टेशनवर चुकीच्या बाजूने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना लोखंडी कुंपणात अडकल्याने तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे सापडलेल्या आधार कार्डवरून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. ढिला राजेश हमीरा भाई असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तो विरार-ब्लाइंड फास्ट लाइन आणि स्टेबलिंग लाइन दरम्यान असलेल्या लोखंडी कुंपणाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

लोकल ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना राजेशची मान कुंपणात अडकली. घटनेची माहिती मिळताच सकाळी १०.१४ वाजता आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका तिथे पोहोचली. रुग्णवाहिका पथकाच्या डॉक्टरांनी घटनास्थळी राजेशचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. त्यानंतर त्याला नायर रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनीही त्याला तपासून मृत घोषित केले. राजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी सांगितले की, राजेश विरुद्ध बाजूने उतरण्याचा प्रयत्न करत होता. लोखंडी कुंपणाच्या बाजूने उतरण्याच प्रयत्न करताना त्याची मान कुंपणात अडकली आणि तो जखमी झाला. दरम्यान, रेल्वे अधिकारी या घटनेची चौकशी करत असून प्रवाशांना असुरक्षितपणे उतरण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon