पनवेलमध्ये शरिर विक्रीचा व्यवसाय, शहर पनवेल पोलिसांचा प्रशांत लॉजवर छापा 

Spread the love

पनवेलमध्ये शरिर विक्रीचा व्यवसाय, शहर पनवेल पोलिसांचा प्रशांत लॉजवर छापा 

पोलीस महानगर नेटवर्क 

नवी मुंबई – पनवेल शहरात ठिकठिकाणी लॉज संस्कृती फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे. याचाच भाग म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत पनवेल येथील प्रशांत लॉजिंग, विसराळी नाका, नवी मुंबई मर्कन्टाईल बँकेसमोर, एमसीसीएच सोसायटी, मुंबई–पुणे रोड या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तिथून पाच पीडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईतून वेश्याव्यवसायात गुंतलेल्या २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत.

वरिष्ट पोलिस निरिक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस बनावट ग्राहक बनले. त्यातून त्यांनी शरिर विक्री करणाऱ्यां विरोधात सापळा रचला. ३० मे रात्री साडे दहा वाजता छापा टाकला. त्यावेळी लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवलेल्या पाच महिला आढळून आल्या. या प्रकरणी राजु विनोद दास, अरूणकांत राजनारायण चतुर्वेदी यांना अटक करण्यात आली आहे. तर मयुर डावरे आणि अरूण शेट्टी हे फरार आहेत. यातला मयुर डावरे हा महिलांचा पुरवठा करणारा होता. तर अरूण शेट्टी हा लॉज चालक आहे. पोलिस तपासात उघड झाले की, आरोपी मयुर डावरे यांच्याकडून महिलांना लॉजमध्ये आणून ठेवले जात होते. वेटर अरुणकांत चतुर्वेदी यांनी बनावट ग्राहकास महिलांची निवड करू दिली. त्यानंतर निवडलेल्या महिलेला वेश्याव्यवसायासाठी पाठवले. त्याबदल्यात ५५०० रुपये घेतले होते.

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत. मात्र पनवेल शहरात असे व्यवसाय होत असल्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. अशा व्यवसायांना वेळीच पायबंद घालण्याची मागणी ही स्थानिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी याबाबत धडक मोहिम राबवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon