दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र पोलिस आणि एटीएसची धडक मोहीम; भिवंडीत १० तासांचे सर्च ऑपरेशन
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – दहशतवादाशी संबंधित एकादहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र पोलिस आणि एटीएसची धडक मोहीम; भिवंडीत १० तासांचे सर्च ऑपरेशन प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळील पडघा बोरिवली परिसरात मुंबई एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी शोध मोहीम राबवली. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पडघा बोरिवली परिसरातील २२ हून अधिक ठिकाणी छापे टाकून शोध मोहीम राबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण बोरिवली परिसराचे पोलिस छावणीत रूपांतरित झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, सीमेशी संबंधित साकिब नाचनच्या घरीही शोध मोहीम राबवण्यात आली, याशिवाय पडघा येथील बोरिवली परिसरात २२ हून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवून लोकांची चौकशी करण्यात आली. डझनभर मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत आणि कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली आहे. राज्यात कोणताही दहशतवादी कट रचला जात आहे का? हे शोधणे हा या छाप्याचा उद्देश होता.
या धडक मोहिमेत ४०० एटीएस कर्मचाऱ्यांच्या १८ हून अधिक वेगवेगळ्या पथकांचा समावेश होता. रविवारी रात्री ३ वाजता सुरू झालेली शोध मोहीम सोमवारी दुपारी १ वाजता संपली. सुमारे १० तास शोध मोहीम सुरू राहिली, सध्या एटीएसने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर देशभरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार मॉकड्रिल राबवण्यात आली. तर विविध राज्यांत अनेक सर्च ऑपरेशनही राबवण्यात येत आहेत. यातच भिवंडीच्या पडघा बोरिवलीमध्येही सर्च ऑपरेशन राबवण्यात आले, ज्याचा उद्देश दहशतवादी कट मोडित काढण्याचा होता.