भिवंडी मानकोली वाहतूक शाखेकडून दिवसाला १२ लाखांची लूट? स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक प्रकार उघड
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – मुंबई, नाशिक महामार्गावर मानकोली येथे वाहतूक शाखा कॅबिनवरील रस्त्यावर अनधिकृत ट्रॅफिक करून राज्य आणि परराज्यातून येणाऱ्या ट्रक चालकांकडून अनधिकृत पावती फाडून त्यांना वेअरहाऊसमध्ये जाण्यास परवानगी दिली जाते. पावती फाडण्यासाठी वाहन चालक रस्त्यावरच वाहने उभे करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्या वाहतूक कोडींचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांच्या मदतीस काम करणारे कर्मचारी परप्रांतीय असून त्यांच्या हातात वाहतूक नियंत्रण वॉकी टॉकी सुद्धा देण्यात आलेले आहे. या कार चालकांकडे गाडीची कागदपत्रं नसल्याचंही सांगितलं जात आहे.
सदर केबिनमध्ये फाडलेल्या पावत्यांचा कुठलाही पुरावा नसताना दिवसाला अंदाजे दोन हजार गाड्या ये-जा करत असतात. एका गाडीचे सहाशे रुपये प्रमाणे १२ लाखाची लूट दिवसाला होत आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते वकील भारद्वाज चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हवर संबंधित व्हिडिओ व्हायरल केले आहे. तो व्हिडिओ आतापर्यंत १८ लाख लोकांनी पाहिले असून वीस हजार लोकांनी त्यांची व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रातून वाहतूक पोलीस भांडाफोड केल्याप्रमाणे शुभेच्छाही मिळत आहेत.