घरासमोर खेळत असलेल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार, टिटवाळा पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेड्या

Spread the love

घरासमोर खेळत असलेल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार, टिटवाळा पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याण जवळील मोहने गाळे गाव परिसरात एका १५ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याच परिसरात राहणाऱ्या इसमाने हे कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सुनील पवार याला बेड्या ठोकल्या. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कल्याण जवळील मोहने गाळेगाव परिसरात सदर गतिमंद मुलगी ही आपल्या कुटुंबासोबत राहते. बुधवारी ही गतिमंद मुलगी आपल्या घराच्या परिसरातील अंगणात खेळत असताना सुनील पवार या नराधमाची नजर तिच्यावर पडली. सुनील पवार याने तिला घरात बोलवून घेतले आणि घराचे दार बंद करत तिच्याशी अश्लील चाळे केले.

बराच वेळ झाला मुलगी दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. त्यांना सुनीलवर संशय आल्याने त्यांनी सुनीलचा दरवाजा ठोकवला. मात्र दरवाजा बंद होता. अखेर या दरवाजाचा टाळा तोडून पीडितेचे कुटुंब घरात गेले असता त्यांना तिकडे मुलगी आढळून आली. घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. या प्रकरणी तात्काळ टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनील पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon