अट्टल वाहन चोरास कोळशेवाडी पोलिसांडून जेरबंद

Spread the love

अट्टल वाहन चोरास कोळशेवाडी पोलिसांडून जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – मोटारसायकल चोरी करणाऱ्या एकास कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पियुष जाधव असे याचे नाव असून, त्याच्याकडून एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लोकग्राम सर्कल, कल्याण पूर्व येथून पियुष जाधव यास अटक करून त्याच्याकडून ८०,०००/-रु. किमंतीची मोटारसायकल हस्तगत केली.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ३, कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वपोनिरी गणेश न्हायदे, सपोनिरी. दर्शन पाटील, सपोनिरी पोड़वा मिलींद बोरसे, पो. हवा. राजेश कापडी, पो. हुया. भागवत सौदाणे, पो. हवा. भगवान सांगळे, पो. हवा. विलास जरग, पो.हवा. नरेश दळवी, पो शि. दिलीप सोनावळे, पो.शि. प्रदिप गिते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon