चारित्र्याच्या संशयावरून २६ वर्षीय तरुणाने लोखंडी रॉडने हल्ला करत ३२ वर्षीय प्रेयसीला संपवलं
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – चारित्र्याच्या संशयावरून २६ वर्षीय तरुणाने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याची घटना घटना समोर आली आहे. नागपुरातील दाभा येथे ही घडली आहे. या हत्येच्या घटेनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. हेमलता वैद्य असं मृत महिलेचं नाव असून अक्षय दाते मारेकरी प्रियकराचे नाव आहे. हेमलता बाहेर काम करते आणि अन्य पुरुषांशी बोलते हे अक्षयला अजिबात आवडत नव्हते. हत्येची घटना घडली त्या दिवशी अक्षय हेमलताला भेटायला तिच्या घरी गेला होता. त्यावेळी देखील ती कुणाशी तरी बोलत होती. हे पाहून रागाच्या भरात त्याने इमारतीच्या पोर्चमध्ये उघड्यावर हेमलताची हत्या केली.
लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर खुर्चीवर बसलेली हेमलता खाली पडली. त्यानंतर अक्षय तिच्यावर हल्ला करत राहील. हेमलता निपचित पडल्यानंतर अक्षय तिथून निघून गेला. हेमलताला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनस्थळी दाखल जाले. पोलिसांनी आरोपीला अमरावती येथून अटक केले असून अधिक तपास सुरू आहे.