रेल्वेमध्ये प्रवाशांची पर्स आणि मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

रेल्वेमध्ये प्रवाशांची पर्स आणि मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

डोंबिवली – भोळा भाबडा चेहरा बनवून रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांना या ना त्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून हातचलाखीने चोरी करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी मोठी कारवाई केलीये. ही महिला पर्समधील मौल्यवान दागिने आणि रोकड चोरत ही एक सराईत चोर आहे. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकल्यात आहेत. वैशाली सचदेव असे या महिलेचे नाव आहे. वैशाली ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्याविरोधात याआधी देखील चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वे प्रवासादरम्यान लोकल गाडीमध्ये महिलांच्या डब्यात महिलांना बोलण्यात गुंतवून गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने महिलांची पर्स व मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली रेल्वे पोलिसांनी लोकलमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर ग्रस्त वाढवली. याच दरम्यान बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीहुन आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये काही महिलांना पर्समधील मोबाईल तसेच छोट्या पर्स चोरी गेल्याचे लक्षात आले.

यापैकी काही महिलांना एका महिलेची पर्स उघडी असल्याने महिलेवर संशय आला. त्यांनी त्या महिलेला हटकले. मात्र, महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिलांनी आरडाओरड केल्याने फलटावर गस्त घालत असलेल्या डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी या संशयित महिलेस ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता तिच्याकडे चोरी केलेला महागडा मोबाईल फोन ,तसेच काही रोख रक्कम आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी केली असता तिचे नाव वैशाली सचदेव असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या विरोधात याआधी देखील रेल्वेत महिलांच्या डब्यामध्ये महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने, छोटी पर्स तसेच मोबाईल, रोख रक्कम चोरी करण्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. ही महिला बोलण्यामध्ये प्रवाशी महिलेला गुंतवायची आणि चोरी करायची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon