महाराष्ट्र हादरला ! जन्मदात्या पित्याचा ६ वर्षाच्या लेकीवर बलात्कार; नराधाम पित्याला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पनवेल – पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जन्मदात्या पित्याने आपल्या सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. जयेश पाटील असे या नराधम पित्याचे नाव आहे. जयेश पाटील विरोधात बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जयेश आणि त्याच्या पत्नीमध्ये घटस्फोट झाला असून मुलीचा ताबा न्यायालयाने जयेश कडे दिला होता. मागील १५ दिवसांपासून नराधम पिता आपल्याच मुलीवर अतिप्रसंग करत होता. लघवीच्या जागेवर आणि पोटात दुखतं असल्याचे पीडितेने नातेवाईकांना सांगितल्यावर आईच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पनवेल तालुका पोलीसांनी आरोपी जयेश पाटील याला अटक केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.