उल्हासनगरातील ऍप्पल बार मध्ये मद्य विक्रीला बंदी, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगरातील – येथील उल्हासनगर नं. २ परिसरातील ऍप्पल बारमध्ये मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचल्यावर या बार मधील मद्य परवान्याची अनुज्ञाप्ती संपल्याची तक्रार मालकाने केल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्याचा फ्रिजर सील केल्याने उल्हासनगरातील या बारमध्ये मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.
श्रीराम चौकात हा ऍप्पल बार असून ही मालमत्ता मधू तेजवाणी यांच्या मालकीची आहे.त्यांनी २०२२ पासून ही मालमत्ता रोहित पांडव यांना भाडेतत्त्वावर दिलेली होती. २०२४ साली भाडेकरार नामा हा संपुष्टात आलेला आहे. मात्र, तरीही सदर चालक हा भाडे देत नसून हॉटेल खाली करायलाही तयार न्हवता, त्यामुळे तेजवानी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हॉटेलची अनुज्ञाप्ती मधू तेजवानी यांच्या नावे असून त्याची मुदत संपलेली आहे, याविषयी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार उल्हासनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऍप्पल बार मधील दारू विक्री करण्यास बंदी घातली असून हॉटेलमधील असलेल्या फ्रिजरला सील करण्यात आले आहे..