राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेत्यावर पोक्सोचा गुन्हा; अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुणे तिथे काय उणे या म्हणीप्रमाणे सध्या पुण्यात सर्व प्रकारची गुन्हेगारी वाढत चालली आहे. पुण्यातील महिला व मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे .शंतनु कुकडे याचा पुणे कॅम्प परिसरात आलीशान बंगला आहे. या बंगल्यात तो गरजु विद्यार्थांसाठी राहण्याची सोय करतो. काही महिन्यांपुर्वी या बंगल्यात दोन मुली राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती. या दोन मुलींनी शंतनु कुकडे ने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर कुकडेवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. शंतनु कुकडे हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय होता. त्याचमुळे पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. पुण्यात एका बंगल्यात तो डान्सबार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकारही सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून शंतनू कुकडेवर काय कारवाई होते हे महत्त्वाचे ठरणार आहे
पुण्यातील कॅम्प परिसरात आलिशान बंगल्यात गरजू विद्यार्थ्यांची सोय करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शंतनु कूकडेने काही महिन्यांपूर्वी या बंगल्यात दोन मुलींना आणले होते .यापैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आहे .या मुलींनी शंतनु कुकडे विरोधात बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर शंतनू कुकडे याच्यावर लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय .राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी तसेच अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष पद शंतनू कुकडे कडे आहे. पुण्यात एका बंगल्यात तो डान्सबार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकारही सुरू असल्याची चर्चा आहे .मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी त्याला इंटरनॅशनल फंडिंग येत असल्याचा आरोपही होतोय .याप्रकरणी शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे .याप्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे . बंगल्याच्या मागे बियरच्या बाटल्या पडल्या आहेत. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यानं पुण्यातल्या बंगल्यात डान्सबार चालवत असल्याचा आरोप आजूबाजूच्या नागरिकांकडूनही होतोय. पुणे शहरात वसतीगृहाच्या आलिशात बंगल्यात वरच्या मजल्यावर खूलेआम डान्सबार सुरु असल्याचं समोर बोललं जातं आहे. या बंगल्यासमोर आलिशान गाड्या येतात. अल्पवयीन मुलींना उभं केलं जातं. काही मुलींना चॉईस केलं जात असल्याचंही समोर आलं होतं.