राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या पाथर्ली येथील शाळा क्रमांक ६२ मध्ये विज्ञान मेळाव्याचे आयोजन

Spread the love

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या पाथर्ली येथील शाळा क्रमांक ६२ मध्ये विज्ञान मेळाव्याचे आयोजन

कल्याण – शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, प्रशासनाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या पाथर्ली येथील आचार्य भिसे गुरुजी विद्यालय, शाळा क्रमांक ६२ मध्ये काल राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग म्हणून घेतला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनामध्ये आपण विज्ञान विषयक ज्या काही अनुभूती घेत असतो त्यांचे विविध प्रयोगांच्या माध्यमातून सादरीकरण केले.

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी घरडा केमिकल्स या कंपनीकडून सीएसआर या उपक्रमांतर्गत आपल्या शाळेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या Interactive Science Lab मधील विविध विज्ञान प्रतिकृतींचा वापर करून विज्ञान विषयक विविध संबोध आणि संकल्पना स्पष्ट करून दाखविल्या. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या अपूर्व विज्ञान मेळाव्यात आपला सहभाग नोंदविला आणि सर डॉ.सी व्ही रमण यांच्या यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon