चिंचपोकळी परिसरातून ५ बांगलादेशी नागरिकांना अटक, काळाचौकी पोलिसांची कारवाई

Spread the love

चिंचपोकळी परिसरातून ५ बांगलादेशी नागरिकांना अटक, काळाचौकी पोलिसांची कारवाई

मुंबई – काळाचौकी पोलीस ठाण्याच्या दहशतवादी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चिंचपोकळी पूर्व येथे मोठी कारवाई करत ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. प्राथमिक तपासात आशुरा खातून (सातखीरा, बांगलादेश) या महिलेने बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे समोर आले. अधिक चौकशीत तिच्यासोबत आणखी चार बांगलादेशी नागरिकही कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात घुसखोरी केल्याचे उघड झाले.

अटक करण्यात आलेल्या इतर चार आरोपी –

१) मोहम्मद सलाम सरदार उर्फ अबु सलाम (अलीपूर, बांगलादेश)

२) सोहाग सफिकुल सरदार उर्फ मोहम्मद सोहाग सफिकुल इस्लाम (सातखीरा, बांगलादेश)

३) मोहम्मद शमिम मुराद हसन अली उर्फ समिम मुल्ला (जोशोर, बांगलादेश)

४) मोहम्मद आलामिन लतिफ मोरोल (सातखीरा, बांगलादेश)

या सर्वांविरोधात पारपत्र कायदा १९२०, परकीय नागरिक आदेश १९४८ आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०४) श्रीमती रागसुधा आर., सहा. पोलीस आयुक्त (भोईवाडा विभाग) घनश्याम पलंगे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक (काळाचौकी पोलीस ठाणे) मनिष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये दहशतवादी पथकाचे अधिकारी पो. उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे, पो. उपनिरीक्षक अविनाश ढेरे आणि पोलीस हवालदार ठोके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon