मुंबईत बँकेतील १२२ कोटींचा घोटाळा, बँकेच्या जनरल मॅनेजरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई – दादर पोलिस ठाण्यात न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी देवर्षी शिशिर कुमार घोष (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेचे जनरल मॅनेजर आणि हेड ऑफ अकाउंट्स हितेश मेहता यांनी विश्वासघात करून बँकेच्या तिजोरीतील १२२ कोटी रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर, ०६८/२०२५, कलम ३१६ (५), ६१ (२) भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हितेश मेहता आणि त्याच्या साथीदारांनी फसवणुकीचा कट रचून प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीतील मोठी रक्कम गैरवापरासाठी लंपास केली. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई करत आहे.