बेटी बचाओ बेटी पढाओ, अभियाननिमित्त बाइक रैली रवि निषाद/मुंबई
मुंबई – टिळकनगर पोलीस ठाण्यातर्फे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या उपक्रमांतर्गत महिला पोलिस अधिकारी व महिला पोलिस अंमलदार यांची बाईक सायकल रॅली काढण्यात आली.’ बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींचे संरक्षण व त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबाबत महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली दरम्यान विविध बॅनर्स बनवण्यात आले. सदर रॅलीमध्ये टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, महिला पोलीस अधिकारी व २५ महिला अंमलदार यांनी भाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन महिला पोलिस उपनिरीक्षक पोर्णिमा हांडे यानी केले होते. ही बाइक रॅली टिळकनगर पोलीस ठाणे येथून सुरू होऊन लाल मैदान-बीएमसी शाळा- नोबेल मेडिकल-सहकार जंक्शन-सह्याद्री गार्डन- अमर महल जंक्शन ते परत पोलीस ठाणे येथे समाप्त करण्यात आली. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत पवार यानी दिली आहे.