महाकुंभमेळा परिसरातील पंडालमध्ये पुन्हा आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही
योगेश पांडे/वार्ताहर
प्रयागराज – महाकुंभ मेळा परिसरात शुक्रवारी पुन्हा एकदा आग लागली. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. शंकराचार्य मार्गावरील सेक्टर १८ जवळ ही आगीची घटना घडली. आरएएफ जवान, यूपी पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
शंकराचार्य मार्गावरील सेक्टर १८ वरील हरिहरानंद कॅम्पमध्ये ही आग लागली होती. मात्र आता अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शंकराचार्य मार्गावरील सेक्टर-१८ मध्ये आग लागली. यादरम्यान पंडालवरही परिणाम झाला. अग्निशमन विभागाला तात्काळ आगीची माहिती देण्यात आली आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट आहे. यावेळी छावणीत उपस्थित असलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
या आगीच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पंडालमधून धूर निघताना दिसत आहे. त्याच वेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. सीएफओचा म्हटलं आहे की याठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही.