ऑपरेशन टायगरला चोख प्रत्यूत्तर; आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत आणि शेवटपर्यन्त राहणार
वावड्या, अफवा आणि चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या ९ खासदारांची एकमुखी ग्वाही
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाचे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने आमच्याकडे येणार आहेत, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. एकूण नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत, असं सामंत यांनी सांगितल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वच्या सर्व खासदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत. आम्ही कोणत्याही वेगळ्या पक्षात जाणार नाही, अशी ग्वाही दिली. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, अरविंद सावंत, अनिल देशाई, संजय जाधव हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. सकाळपासून बातम्या पसरवल्या जात आहे. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यांच्यात एकमत नाही. विसंवाद आहे. सरकारमध्ये येऊनही रोज बातम्या येत आहे. त्यामुळे चर्चेचा विषय दुसरीकडे वळवण्यासाठी कुणी तरी पुडी सोडली आहे. ज्यांचे सरकारमध्ये गंभीर वाद सुरू आहे. त्यातून चर्चा दुसरीकडे वळवावी हा प्रयत्न केला जात आहे. जाणीवपूर्वक सकाळी ७ वाजल्यापासून बातम्या सोडल्या कोणी तरी. आमच्या कार्यालयाचं काल उद्घाटन झालं. आमचे सर्व खासदार उपस्थित होते. आजही सर्व उपस्थित आहे. आमची वज्रमूठ मजबूत आहे. टायगर जिंदा आहे. टप्प्प्याटप्प्याने त्यांच्यातीलच एक माणूस आमदार घेऊन भाजपकडे जाणार होता. पुन्हा आमच्या खासदार आणि त्यांच्या निष्ठेबद्दल मन कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा निषेध करतो. हे लोकं कठिण प्रसंगात राहिलेले हे खासदार आहेत. काही चढउतार होऊ द्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत…”, असे अरविंद सावंत म्हणाले.
आम्हाला कुणाचाही फोन आलेला नाही. फोन आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. १०० टक्के आम्ही कुठेच जाणार नाही. पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आहे कळू द्या. बांगलादेशात काल हिंदूंवर हल्ला झाला. अमेरिकेत जे काही घडलं,. आपल्या लोकांना बेड्या ठोकून देशात आणलं गेलं. इथे अमृतसरमध्ये अमेरिकेच्या मिलिट्रीचं विमान उतरतं हा देशाचा अपमान आहे. हे तिकडे डुबकी घेत आहेत. त्यांना हिंदुत्वाशी काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. काल अमेरिकेने देशाचा अपमान केला आहे. छोट्या देशांनी अमेरिकेला डोळे वटारून सांगितलं. आमचे विमान येईल आणि आमचे लोक घेऊन जाईल. पण तुम्हाला का सांगता आलं नाही”, असेही अरविंद सावंत म्हणाले. तुम्ही ट्रम्पचा हात मिळवून प्रचार केला होता. तेव्हा ट्रम्पचा पराभव झाला. तुम्हाला ट्रम्पच्या निमंत्रणाची वाट पाहावी लागली होती. झोंबतंय तुम्हाला. आमचे खासदार चिडले आहेत. मतदारसंघात आमच्याबद्दल नको त्या चर्चा होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही. आमचं हिंदुत्व बावनकशी आहे. ढोंगी नाही. जो राष्ट्रासाठी प्राण देईल तो आमचा हिंदू आहे”, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले.
“जे गेले ते ईडीच्या भीतीने गेले. प्रलोभनासाठी गेलेत. ते काही निष्ठेसाठी गेले नाहीत. चंद्राबाबू नायडूंनी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षणाची मागणी केलीय. वक्फ बोर्डाला मान्य नाही. त्यामुळे ते गेले तर कोणी तरी पाहिजे म्हणून पुड्या सोडल्या जात आहेत. नितीश कुमारही नाराज आहेत.उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना नुसता आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा घेतला आहे. त्यांनी आदर्श घालून घेतला. संजय राठोडांचा राजीनामा घेतला होता. आता मुंडेंवर एवढे आरोप होत आहेत. पण त्यावर काहीच निर्णय होत नाही”, असे अरविंद सावंत म्हणाले.
एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही. एकनाथ शिंदे यांनी जे काम केलं त्यासाठी मिशन राबवण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेणारी शिवसेना चालते. त्यामुळे अनेक लोकं आमच्या संपर्कात आहेत. निश्चित आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे, हे निश्चित आहे, असं उदय सामंत म्हणाले होते. मी असं म्हटलं होतं की येत्या ९० दिवसात १० ते १२ माजी आमदार उबाठा आणि महाविकास आघाडीचे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत. यावर मी आजही ठाम आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व चांगलं असल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे, असंही त्यांनी सांगितलं. सर्वच येणार आहेत.राहिलेले सर्वच येणार आहेत. तिकडे काही राहिलेले नाही. त्यांच्या मेन नेत्यांचीही इकडेच एन्ट्री होणार आहे. आठ दहा दिवसात त्यांचा प्रवेश होणार आहे. तो जो बडबड करतोय, तोही एकदोन दिवसात येणार आहे, असं आमदार संतोष बांगर म्हणाले.