मशाराष्ट्रात मद्याची तस्करी करणाऱ्या इसमावर कल्याणच्या पथकाची ‘भरारी’ पुष्पा स्टाईल कारवाई

Spread the love

मशाराष्ट्रात मद्याची तस्करी करणाऱ्या इसमावर कल्याणच्या पथकाची ‘भरारी’ पुष्पा स्टाईल कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – दारू तस्करी करण्यासाठी काही महाभाग वेगवेगळ्या कल्पना सोडून काढतात. अशीच एक भन्नाट कल्पना तस्करी करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. दारू तस्करानी चक्क टेम्पोच्या खालच्या बाजूला मोठा चोरकप्पा बनवून त्यामध्ये विदेशी दारूची तस्करी करण्याचा करत होते. मात्र राज्य उत्पादन शुल्क ठाणे भागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे साडेपाच लाखांचा मद्यसाठा जप्त करत एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. दमन, दादरा नगर हवेली येथील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात आणून विक्री करण्याचा प्लान होता. वाडा- शहापूर मार्गावरून एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात दम्पा दादरा नगर हवेली येथील विदेशी मद्य महाराष्ट्रात विद्र करण्यासाठी बेकायदेशीर रित्या आणण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या भरारी पथकाचे निरीक्षक दिपक परब यांनी सहकाऱ्यांसह वाडा- शहापूर रोडवर सापळा रचला. याच दरम्यान संशयित टेम्पो दिसताच पथकाने टेम्पो अडवला. मात्र टेम्पो रिकामा दिसून आला. टेम्पोच्या मागील बाजूस असलेला पत्रा उचकटून पाहिला असता त्याखाली मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य लपवून ठेवल्याचे आढळून आले. हे विदेशी मद्य दमण, दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बेकायदेशीर रित्या आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भरारी पथकाने तत्काळ कारवाई करत साडेपाच लाखांचे विदेशी मद्य जप्त केले. याच दरम्यान संधीचा फायदा घेत टेम्पो चालक हा पसार झाला. तर त्याचा साथीदार हरिसिंग गहलोत याला एक्साईज विभागाने ताब्यात घेतलं. दरम्यान हा मद्य साठा नेमका कुठून आणला?, महाराष्ट्रात ते कोणाला विकणार होते याचा तपास आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon