सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं स्केच जारी; अहिल्यानगर पोलिसांचं आवाहन

Spread the love

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं स्केच जारी; अहिल्यानगर पोलिसांचं आवाहन

योगेश पांडे / वार्ताहर

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. पण तीन दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे. अखेरीस पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र जारी केले आहे. या संशयिताची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथं तीन दिवसांपूर्वी १५ मार्च रोजी शाळेमधील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केला होता. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी इथं हलवण्यात आलं आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी ही अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने आपल्या घरी जात असताना अचानक तिच्या समोर येऊन अज्ञात एक युवकान तिच्या चेहऱ्यावरती ॲसिड फेकलं. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक गोळा झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ॲसिड फेकणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहे. धक्कादायक म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील रणखांब गावात लग्नाला नकार दिल्याने एका मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असताना तालुक्यात घडलेल्या दुसऱ्या घटनेने एकच खळबळ उडाली.

या घटनेने नातेवाईकांसह गावकरीही धास्तावले असून ही घटना कोणत्या कारणावरून झाले हे अजूनही स्पष्ट झाले नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत असून मुलीवर लोणी येथील प्रवरा रूग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहे. मुलीचा चेहरा सात टक्के भाजला आहे. सदर मुलीच्या चेह-यावर ॲसिड फेकणारा तरूण अनोळखी असल्याचं पीडित मुलीचं म्हटलंय.

मुलीच्या घरची गरीब परीस्थिती आहे. शाळेपासून चार किमी अंतरावर हे कुटुंब वस्तीवर राहतात. मुलीला वडिल नाहीत. त्यामुळे मामा त्यांचा सांभाळ करत आहे. या घटनेमुळे कुटुंबीय धास्तावले असून आमच्या मुलीवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आई आणि मामाने केली आहे.दरम्यान, संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथं सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे.. जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे. मुलीवर आज रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon