बांग्लादेशीय मुस्लीमांना भारतात उपचार बंद करण्याची घाटकोपर भाजपाची मागणी
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – बांग्लादेशातील कॅन्सर रुग्णांना भारतामधील टाटा रुग्णालयत मोफत उपचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घाटकोपर पूर्व भाजपाचे मंत्री सुशील भाई गुप्ता यानी आपले समर्थकासह मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयत एक निवेदन पत्र देऊन मागणी केली आहे की, बांग्लादेशीय नागरिकाना उपचार बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितनुसार, घाटकोपर पूर्व विधानसभा मंत्री जेष्ठ समाजसेवक सुशील भाई गुप्ता यानी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुंबई येथील टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये विजिट वीजा घेऊन बांग्लादेशी मुस्लिम येतात आणि आपल्या कैंसरचा उपचार घेऊन परत जातात. गुप्ता यानी असे सांगितले की, बांग्लादेशमध्ये हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे. हिंसा होत आहे, त्यांची हत्या केली जात आहे. आम्हाला याचे दुःख आहे म्हणून त्यांच्या येथे होत असलेले उपचार थांबवावेतवे आणि त्याना परत बांग्लादेशमध्ये पाठवावे. जेणेकरुन आपल्या देशाचे रुग्णाचे उपचार स्वस्त आणि सुखकर होईल आणि त्यांचे उपचार लवकरात लवकर होऊ शकतो. गुप्ता यानी असे सांगितले की, जर आमची ही मागणी मान्य केली गेली नाही तर आम्ही टाटा मेमोरियल रुग्णालय विरोधात साखळी उपोषण करू. त्यानंतर त्याची सर्व जबाबदारी रुग्णालय प्रशासनची असेल याची नोंद घ्यावी. सदर निवेदन देताना गुप्ता यांच्या सोबत अर्जुन गुप्ता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.