सोमय्या कॉलेजमधील प्रवेश घोटाळा; ५५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३ लाख रुपयांची वसूली

Spread the love

सोमय्या कॉलेजमधील प्रवेश घोटाळा; ५५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३ लाख रुपयांची वसूली

लिपिकांसह दलालांकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

रवि निषाद/प्रतिनिधि

मुंबई – विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजमध्ये बनावट गुणपत्रिका आणि सोडतीच्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश दिल्याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील आरोपी लिपिकांना हाताशी धरून सोमय्या महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे तपासात समोर आले आहे. कोट्याच्या नावाखाली अकरावीच्या प्रवेशावेळी कॉलेज प्रशासन आणि व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे. याशिवाय, सीबीएसई, आयबी, आयसीएसई, आयजीसीएसई आणि इतर शैक्षणिक मंडळांच्या अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या आणि लोगो असलेली बनावट मार्कशीट तयार करण्यात आली होती. ही बाब सोमय्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या निदर्शनास आली, त्यानंतर त्यांनी समिती नेमून चौकशी केली. २४ विद्यार्थ्यांच्या मार्कशीट बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. के.जे. सोमय्या कॉलेजमध्ये बनावट मार्कशीट आणि बनावट शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे इयत्ता ११ वीला प्रवेश देण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेला दलाल देवेंद्र साडे हा ज्या विद्यार्थ्यांच्या मुलांना कमी गुण मिळाल्याने प्रवेश दिला जात नव्हता, त्यांच्या पालकांशी संपर्क साधायचा आणि प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन त्यांच्या मुलांना सोमय्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन तो देत असे. कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्याच्या नावाखाली ५० ते ५५ विद्यार्थ्यांकडून २ ते ३ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणाचा तपास टिळक नगर पोलीस करीत आहेत. यामध्ये अजून कुणी सामील आहेत का हे सुद्धा तपासले जात आहे. हे रॅकेट एकाच कॉलेजमध्ये आहे की इतर कॉलेजांचाही यात सहभाग आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत. कॉलेज प्रशासनामध्ये सहभागी असलेला महेंद्र पाटील आणि अर्जुन राठोड या दोन महाविद्यालयीन लिपिकांना निलंबित केलं असून पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये त्यांचे साथीदार कमलेश भाई, जीतू भाई आणि बाबू भाई यांच्या सोबत संगनमत करुन ही फसवणूक केली आहे. या रॅकेटमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वीच्या बनावट प्रवेशांचा समावेश आहे. सदर प्रकरणाचा तपास परिमंडळ-६ चे डैशिंग पोलिस उपायुक्त नवनाथ ढवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवनार विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त आबुराव सोनावणे व त्यांचे विशेष पथक़ातील दोन पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, गुंडा शाखेचे अधिकारी राठोड़ आणि दक्ष महिला पोलिस उपनिरीक्षक सौ.पोर्णिमा हांडे व इतर पोलिस कर्मचारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon