जुन्नरमध्ये पत्रकाराला शिवीगाळ व अर्वाच्य भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
जुन्नर – येथील तालुक्यातील आपटाळे येथील पत्रकार संदीप उत्तर्डे यांना मागील तीन वर्षांपूर्वी दिलेल्या बातमीचा आकस मनात धरून त्यांना फोनवर शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी येथील स्वयंघोषित समाज सेवक अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी व पत्रकारांच्या वतीने आज गुरुवार दि. १९ रोजी काळ्या फिती लावून जुन्नर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. पत्रकार संदीप उत्तर्डे यांना दि (१७) रोजी शिरोली, बु.” ता.जुन्नर येथील अक्षय मोहन बोहाडे यांने तीन वर्षापुर्वी केलेल्या बातमीचा राग मनात धरून दुरध्वनीवरुन शिवीगाळ करत धमकी देऊन दोन तीन दिवसात मी काय करतो ते पहा असे म्हणून घातपात करण्याची धमकी दिली. याबाबत सर्व पत्रकारांच्या वतीने जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, जेष्ठ पत्रकार रवींद्र कोल्हे, जुन्नर तालुका पत्रकार संघाचे सचिव सचिन कांकरिया, जुन्नर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किरण वाजगे, आपला आवाज न्यूज नेटवर्क चे निवासी संपादक पवन गाडेकर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजोग काळदंते, ज्येष्ठ पत्रकार, सुरेश वाणी, रमेश तांबे, सुरेश भुजबळ,पराग जगताप, मंगेश पाटे, संजय थोरवे, अरुण मोरे, नितीन गाजरे, किरण साबळे, अमोल गायकवाड, पवन गाडेकर नितीन ससाणे, प्रवीण फल्ले, भरत अस्वार, नयन डुंबरे, महेश घोलप, मनोहर हिंगणे, अमर भागवत, राजेश कणसे अशपाक पटेल, सोनू गाडे तसेच जुन्नर तालुका पत्रकार संघ, जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ,-शिवजन्मभूमी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
अक्षय मोहन बोऱ्हाडे याची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता संदीप पांडुरंग उत्तर्डे यांच्या जीवितास धोका आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बातमी दिल्याचा राग मनात धरून शिवीगाळ करून धमकी देणे असे प्रकार घडू लागल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मिडीया व त्यांचे प्रतिनिधी पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.
अक्षय बोऱ्हाडे याच्यावर यापूर्वीही आळेफाटा व जुन्नर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. बोऱ्हाडे याने दिलेल्या धमकी प्रकरणी संदीप पांडुरंग उत्तर्डे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. अक्षय बोऱ्हाडे याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून अटक कारण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.