बलात्काराचा आरोपीला चेंबूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक, दोन महिन्यांपासून होता फरार

Spread the love

बलात्काराचा आरोपीला चेंबूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक, दोन महिन्यांपासून होता फरार

रवि निषाद/प्रतिनिधि

मुंबई – चेंबूर पोलिसांच्या हद्दीत झालेल्या एका बलात्काराच्या घटनेमध्ये आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. बलराज सार्दुल सिंह (३२) हा दोन महिन्यांपासून फरार होता आणि मोहनपूर, अमरिया, उत्तर प्रदेशाच्या पीलीभीतमध्ये जाऊन लपून बसला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ०३/१०/२०२४ रोजी चेंबूर पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४६३/२०२४ कलम ३७६(२),(एन), ४२०, ४०६, ५०६ च्या कलमानुसार दाखल केला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा दाखल झालेल्या तारखेपासून फरार होता तसेच सदर आरोपी वारंवार उत्तरप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड अशा ठिकाणी आपले ठिकाण बदलत असल्याची माहिती मिळाली होती. सदर आरोपीच्या शोधार्थ चेंबूर पोलिस ठाण्याचे पथक दि.१३/१२/२४ रोजी रवाना करण्यात आले होते. तपास पथकाने मुंबई ते मथुरा २८ तासांचा रेल्वे प्रवास व तदनंतर मथुरा ते पिलीभित येथे खासगी वाहनाने ८ तासांचा प्रवास करून दि.१५/१२/२४ रोजी,रात्रौ २३.४२ वाजता च्या दरम्यान,नमूद आरोपीला स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने गाव – मोहनपुर, ता.अमरीया,जि.पिलीभित, उत्तरप्रदेश या गावातून नातेवाईकांच्या विरोधात सामोरे जाऊन शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीला दि.१६/१२/२४ रोजी जिल्हा न्यायालय पिलिभित, उत्तरप्रदेश यांच्या समक्ष उभे करून,ट्रान्झिट रिमांडवर मुंबई येथे आणण्यात आले आहे. दिनांक १९/१२/२४ रोजी, चेंबूर पोलिस ठाणे येथे आणण्यात आले आहे. सदर ची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे परिमंडळ ०६, सहाय्यक पोलीस आयुक्त ढिकले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पो.नि.(गुन्हे) संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथक पो.उप.नि.सुनील पाडाळे

पो.ह.क्र.०६०४१४/ साई तांगडे पो.शि.क्र. ११११२८/सुधीर माने यानी ही उत्तम कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon