निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला कल्याणच्या गांधारी परिसरात १ कोटीहून अधिक रक्कम सापडल्याने खळबळ
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – राज्यातील विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणा दिवस रात्र काम करत आहे. राज्यात निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. रविवारी कल्याणमधील गांधारी परिसरात तपासणी पथकाला एका व्हॅनमधून तब्बल १ कोटी २० लाख इतकी मोठी रक्कम मिळाली आहे. कल्याणच्या गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकाने वाहन तपासणी दरम्यान एटीएमच्या व्हॅनमध्ये एक कोटी रुपयांची रोकड ताब्यात घेतले असून एकूण रक्कम एक कोटी वीस लाख असल्याचे समजते. व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना या रक्कमेबद्दल विचारणा केली असताना त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी व्हॅन ताब्यात घेतली आहे. तसेच चौकशी सुरू केली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे समजते.
विशेष म्हणजे रविवारीच मुंबईतील विक्रोळीत एका व्हॅनमध्ये ६ हजार ५०० किलोच्या चांदीच्या विटा साडपल्यानंतर कल्याणमध्ये १ कोटींहून अधिक रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.