इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकाचा सहकारी महिलेवर बलात्कार; मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकाचा सहकारी महिलेवर बलात्कार; मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. नाशकातील नामांकित इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकाने हाताखाली काम करणा-या महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखविण्यात आल्याने ही घटना घडली असून, दीड ते दोन वर्ष उलटूनही संशयिताकडून लग्नास टाळाटाळ होत असल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास अग्रवाल (५४ रा.लुधीयाना पंजाब) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अग्रवाल गडकरी चौकातील नामांकित इन्शुरन्स कंपनीत प्रादेशिक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. याच कार्यालयातील पीडिता कर्मचारी असून २०२२ मध्ये संशयिताने महिलेस लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघांमध्ये प्रेमसंबध प्रस्थापित झाले होते. या काळात संशयिताने आपल्या कार्यालयात, कश्यपी धरणावर क्रेटा कारमधून घेवून जात तसेच गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर येथील आनंदनगर भागात असलेल्या घरी घेवून जात सहकारी असलेल्या महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार दीड – दोन वर्षापासून सुरू होता. काही महिन्यापासून संशयिताने टाळाटाळ करण्यास सुरूवार केल्याने महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने लग्नासह आर्थिक मदत करण्यास नकार दिल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक दत्ता गोडे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon