दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद ;कोल्हापूर पोलिसांच्या कारवाईत एकूण ८६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त.
योगेश पांडे – वार्ताहर
कोल्हापुर – कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण १३ घरफोड्या केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या टोळीकडून पोलिसांनी १ किलो २०० ग्रॅम सोने,१ किलो ४३० ग्रॅम चांदी आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण ८६ लाख २६ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्दे मला जप्त केला आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेली टोळी दिवसा घरफोडी करत होती. याचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. या पोलिसांकडून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण १३ घरफोड्या केल्याचे उघड केले आहे. अलिकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरटे दिवसा देखील घरफोडी करतना दिसत आहेत. त्यामुळं आशा घटना होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. दरम्यान, कोल्हापुरात पोलिसांनी चोरट्यांना अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामध्ये आणखी कोणी आहेत का? याचा तपास सुरु आहे. या प्रकारच्या चोरीच्या घटना होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे ते म्हणाले.