पत्नीशी प्रेमसंबंधाच्या संशयावरुन सावकाराची गोळ्या झाडून हत्या; ६ लाखाची सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या तीघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
सांगली – कासेगाव येथील खासगी सावकार पांडूरंग सिद – ४३ याचा खून प्रेम संबंधाच्या संशयावरुन सहा लाखाची सुपारी देऊन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीसांनी तिघांना अटक केल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून रविवारी सायंकाळी देण्यात आली. सिद यांचा खून गोळ्या झाडून करण्यात आला होता. या खून प्रकरणी विशाल जयवंत भोसले – (२५), शिवाजी भिमराव भुसाळे – (३७),आणि सुरेश नारायण ताटे – (४५) या तिघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार दि.१६ रोजी कासेगाव वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला पांडुरंग भगवान शिद (४३), यांचा गोळ्या झाडून खून करण्या आला होता. यामुळे वाळवा तालुक्यात खळबळ माजली. संशयिताबाबत कोणताही पुरावा घटनास्थळी नव्हता, अथवा माहिती नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी मृतासोबत असलेल्या आर्थिक व्यवहार, सावकारी तसेच अनैतिक संबंध च्या अनुषंगाने संशयितांची माहिती काढण्यासाठी तसेच घटनास्थळ परिसरातील चलतचित्रीकरण, भ्रमणध्वनी संभाषण या तांत्रिक बाबीतून तपास करण्यासाठी वेगवेगळी तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला, गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताना ताब्यात घेतले.
संशयित ताटे याने त्याचे पत्नीचे मृतासोबत प्रेमसंबंध असलेचा संशय मनात धरुन इतर दोन आरोपीना खुनाची सुपारी देवून हत्यार पुरवून काम झाल्यानंतर सहा लाख रुपये देण्याचे ठरले होते. यानुसार भोसले व भुसाळे या दोघांनी सिद याचा गोळ्या झाडून खून केला.