दिड वर्षापुर्वी बेपत्ता रमण साबळेचा खुन, सोलापूर शहर गुन्हे शाखेने केली गुन्ह्याची उकल

Spread the love

दिड वर्षापुर्वी बेपत्ता रमण साबळेचा खुन, सोलापूर शहर गुन्हे शाखेने केली गुन्ह्याची उकल

पोलीस महानगर नेटवर्क

सोलापूर – रमण सातप्पा साबळे हा दि.११/०४/२०२३ रोजी आंबेडकर जयंती निमित्त मुंबईला जातो असे सांगुन, सायंकाळी ०५.०० वा. राहत्या घरातुन गेला होता. परंतु तो पुन्हा घरी परत आला नाही. त्यामुळे, त्याची आई श्रीमती मिना सातप्पा साबळे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झालाबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे मिसिंग नं- ३६/२०२३ प्रमाणे दि.१८/०४/२०२४ रोजी दाखल होती. त्याअनुषंगाने, सदर मिसिंगचा तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून करण्यात येत होता. बेपत्ता रमन सातप्पा साबळे याचा एप्रिल २०२३ पासून शोध लागला नाही. त्यामुळे, त्याची आई श्रीमती मिना सातप्पा साबळे यांनी, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांना समक्ष भेटुन मुलाचा शोध व्हावा म्हणून विनंती केली होती. त्यानुसार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी, बेपत्ता इसमाचा शोध घेणेबाबत, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), सोलापूर शहर यांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) सोलापूर शहर यांनी, गुन्हे शाखेचे व.पो.नि. सुनिल दोरगे, स.पो.नि. संदीप पाटील व सायबर पोलीस ठाणेकडील अंमलदार प्रकाश गायकवाड यांना समक्ष बोलावुन बेपत्ता रमण तसेच संशयीत इसमाचे मोबाईल क्रमांकाची तांत्रीक माहिती व बँक व्यवहाराचे सखोल अभ्यास करून, बेपत्ता इसमाचा प्राधान्याने शोध घेणे बाबत मार्गदर्शन करून, सदरचा अर्ज पुढील चौकशी करीता, गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदीप पाटील यांना दिला होता.

सदर अर्जाची चौकशी स.पो.नि. संदीप पाटील व त्याचे पथकाने रमन साबळे हा बेपत्ता झाल्यापासुनची फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून सविस्तर माहिती प्राप्त करून घेतली. तसेच बेपत्ता इसमाची आई, पत्नी, भाऊ, तसेच तो, ज्या बँकेत कामास होता, त्या बँकेतील मित्रांकडे विचारपूस केली असता, घरगुती वाद तसेच कामाचे ठिकाणी देखील कोणा सोबत वाद नसल्याचे दिसुन आले. बेपत्ता रमनचे मोबाईल बाबत तांत्रीक तसेच बँक व्यवहाराची सविस्तर माहिती प्राप्त केली असता, बेपत्ता रमन साबळे याचा विशाल बनसोडे याच्याशी संपर्क तसेच त्यांच्यात पैशाचा व्यवहार झाल्याचे दिसुन आले. त्यानुसार स.पो.नि. संदीप पाटील व त्यांचे तपास पथकानी, दि.२६/०७/२०२४ रोजी विशाल दत्तात्रय बनसोडे वय-३६ वर्षे, रा. सावित्रीबाई फुले सोसायटी, संभाजीपुर, नांदणी रोड, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यास ताब्यात घेवुन, विचारपूस केली असता, त्यांनी प्रथम खोटी व दिशाभुल करणारी माहिती दिली. परंतु, त्यास बेपत्ता इसमासोबत त्याचे पैशाच्या व्यवहारा बाबत व फोन वरून यापुर्वी झालेल्या संभाषणा संबंधाने सखोल विचारपूस केली असता, त्यांनी सांगीतले की, दि.११/०४/२०२३ रोजी, रात्री सांगोला तालुक्यातील, अनकढाळ टोल नाक्याजवळील राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे बाजुस असणाऱ्या माळरानावर, त्या दोघांमध्ये ४७ लाख रुपये पैशाच्या देवाण-घेवाणी वरून वाद झाला. त्या वादामध्ये विशाल दत्तात्रय बनसोडे याने रमण साबळे याचा गळा दाबुन खुन केला. त्यानंतर विशाल दत्तात्रय बनसोडे याने सांगोला येथील अनकढाळ टोल नाक्याजवळील एका पेट्रोलपंपावरून पेट्रोल व डिझेल आणुन कोणाची बॉडी आहे हे ओळखु येवु नये म्हणून त्या बॉडीवर पेट्रोल व डिझेल टाकुन पेटवुन दिले असल्याचे सांगितले. विशाल दत्तात्रय बनसोडे याच्या सांगण्याप्रमाणे सपोनि संदिप पाटील व त्यांच्या तपास पथकानी, सांगोला पोलीस ठाणेच्या अभिलेखावर गुन्हा दाखल का? यांची माहिती घेतली असता अज्ञात इसमाचा खुन करून पुरावा नष्ट केले बाबत, सांगोला पोलीस ठाणेस गु.र.नं.३२६/२०२३ भादंवि-३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे, तसेच मागील १५ महिन्यापासुन सदर गुन्ह्यातील मयताची अद्याप ओळख पटली नसल्याचे व गुन्ह्यातील आरोपी देखील मिळाला नसल्याचे माहिती प्राप्त झाली. त्यावरून फौजदार चावडी पोलीस ठाणे मिसिंग नं-३६/२०२३ मधील बेपत्ता रमन सातप्पा साबळे याचा पैशाच्या वादातुन विशाल दत्तात्रय बनसोडे याने खुन केला असल्याची कबुली दिली. विशाल दत्तात्रय बनसोडे यास सांगोला पोलीस ठाणेस गु.र.नं.३२६/२०२३ भादंवि-३०२,२०१ या गुन्ह्याचे पुढील तपासकामी रिपोर्टसह हजर करून दीड वर्षानंतर अर्जावरून फौजदार चावडी पो.स्टे. मिसिंग नं-३६/२३ मधील बेपत्ता इसमाचा शोध तसेच सांगोला पो.स्टे. गुरनं-३२६/२३ हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगीरी, एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. संदिप पाटील, व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, वसीम शेख, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon