कर्जाचा मोह नडला,२ लाख २३ हजाराला चुना; धाराशिव पोलिसात गुन्हा नोंद

Spread the love

कर्जाचा मोह नडला,२ लाख २३ हजाराला चुना; धाराशिव पोलिसात गुन्हा नोंद

पोलीस महानगर नेटवर्क

धाराशिव – राज्यात ऑनलाईन फसवणूकीचे लोण सर्व ठिकाणी पसरले आहे. पोलिसांनी आवाहन करून देखील नागरिक आमिषाला बळी पडतात. अशीच एक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. कर्ज मिळवण्याचा मोह धाराशिव येथील एका तरुणाला चांगलाच महागात पाडला आहे, ऑनलाईन अर्ज भरल्याने कर्ज मिळेल अशी त्याला आशा होती मात्र कर्ज मिळणे दुरच त्याला स्वतःच्या खिशातील २ लाख २३ हजार रुपयांना चुना लागला आहे. आरोपी मो.क्र. ९५५८११०९७४, शितल शिंदे, मो.क्र. ९६२४४३३२७०, श्वेता शिंदे, मो. क्र. ९१५२९१९३१६, चेतना पवार, मो. क्र. ८४०१५८१०१६ अविनाश देशमुख व इतर प्रदीप कुमार, शुभम खातुन व सागर भगवान मोकाले यांनी ९ नोव्हेंबर २०२३ ते १६ जुलै २०२४ या काळात फसवणूक केली.

धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील डोकेवाडी येथील फिर्यादी पोपट अंकुश खैरे यांच्या मोबाईलवर फेसबुकवर ऑनलाईन आयडीएफसी फस्ट बँकेची लोन बाबतची जाहीरात पाहिली व त्यावरील लोन बाबतचा फॉर्म भरला असता आरोपींनी फिर्यादीस ऑनलाईन लोन मंजुर करतो असे म्हणून वेळोवेळी फाईल चार्जचे कारण सांगुन फिर्यादी यांचे कडून २ लाख २३ हजार ऑनलाईन पैसे घेवून फसवणुक केली. खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (१) सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम २००८ चे कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon