स्टॉक ट्रेडिंग गुंतवणुकीचे अमिष, तरुणाची पावणे सात लाखांनी फसवणूक

Spread the love

स्टॉक ट्रेडिंग गुंतवणुकीचे अमिष, तरुणाची पावणे सात लाखांनी फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – व्हाट्सएपद्वारे स्टॉक ट्रेडिंग मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली रमनकुमार नागराजाराव कंचीसमुद्रन (रा. यशस्वीनगर, ठाणे) या ३९ वर्षीय तरुणाची ६ लाख ७४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.ठाण्यातील यशस्वीनगर परिसरात राहणारे कंचीसमुद्रन यांना एका भामटयाने त्यांच्या व्हाट्सएपवर संपर्क केला. शेअर ट्रेडिंग कसे करायचे? स्टॉक मार्केटमध्ये कोणते शेअर्स खरेदी केल्यास जास्तीत जास्त फायदा होईल, याची जाहिरात एका ग्रुपवर करण्यात आली होती. त्याद्वारे इट्रेड हे अँप डाउनलोड करण्यास सांगितले. सदर अँप द्वारे फिर्यादी यांना अपर सर्किट स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी एकूण ६,७४,०००/- रुपये रक्कम ऑनलाईन आरोपीच्या बँक खात्यावर वळती करण्यास सांगून ती परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

फिर्यादीला पैसे किंवा त्यापोटीचा नफा अशी कोणतीही रक्कम त्यांना या भामट्यांनी परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) या कायद्याखाली कापूरबावडी पोलिस ठाण्यात या सायबर भामटयांविरुद्ध गुन्हा रजि.नं. || ६००/२०२४ दाखल केला आहे. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon