लोणावळा भुशी धरणाच्या पाण्यातून एकाच कुटुंबातील ५ जणांचा वाहून मृत्यू; परिसरात हाहाकार

Spread the love

लोणावळा भुशी धरणाच्या पाण्यातून एकाच कुटुंबातील ५ जणांचा वाहून मृत्यू; परिसरात हाहाकार

पोलीस महानगर नेटवर्क

लोणावळा – पावसाळा सुरू झाला की लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षासहलीसाठी पर्यटक मोठया प्रमाणावर येत असतात. भुशी धरण क्षेत्रात अलोट गर्दी पहायला मिळते. लहान मुले, मुली, महिला, पुरुष आणि युवा वर्ग वर्षाविहारासाठी खंडाळा, लोणावळा, ताम्हिणी, पवना अशा ठिकाणी आनंद लुटण्यासाठी येत असतात. दि. (३० जून) ला वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी धरणाच्या परिसरात पर्यटनाकरिता आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेल्यांपैकी दोघांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर येत आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, पोलीस आणि वन्यजीव रक्षक यांच्या मदतीने इतर पर्यटकांची युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून ५ पर्यटक धरणात वाहून गेले असल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी दोन जणांचा मृतदेह मावळ वन्य जीव यांना सापडले. तर इतर पर्यटकांची शोधमोहीम रक्षक टीम, स्थानिक युवक आणि शिवदुर्ग रेसक्यू पथकाच्या रक्षक टीम, स्थानिक युवक आणि शिवदुर्ग रेसक्यू पथकाच्या मदतीने सुरु आहे. दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. लोणावळा परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते.

दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले आहेत. ही माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मुले वानवडी येथील सय्यदनगर भागातील असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon