नवीन कायद्याबाबत सफाळे आणि केळवा पोलिसांकडून जनजागृती
पालघर / नवीन पाटील
पालघर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सफाळा पोलीस ठाणे आणि केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विविध पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती कमिटी, जेष्ठ-कनिष्ठ, पत्रकार, सर्प मित्र, सागर रक्षक दक, ग्रामरक्षक दलाचे सदस्य, सर्व ग्रामस्थ यांना नवीन कायद्यात काय बदल अथवा नवीन काय काय समाविष्ट केले आहे याची माहिती दिली.
यासंदर्भात सफाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे तसेच मपोउपनिरी प्राजक्ता पाटील यांनी शुक्रवारी देवभूमी हॉल,येथे तर केळवा सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी शनिवारी केळवा येथे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी भारत सरकारचे 1 जुलै 2024 पासून अंमलात येणारे नवीन प्रमुख फौजदारी कायदे यात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 यामध्ये झालेले बदल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या जनजागृतीपर कार्यक्रमाला दोन्ही पोलीस ठाण्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर सफाळे पोलिसांच्यावतीने पोहवा कैलास शेळके यांनी प्रास्ताविक केले.