पुण्यातील सराफाच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या, इतर तिघांचा शोध सुरु

Spread the love

पुण्यातील सराफाच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या, इतर तिघांचा शोध सुरु

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – एका सराफाच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी सिनेस्टाईल अटक केली आहे. भोर, तळेगाव दाभाडे येथून सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना भोर पोलिसांनी वडगाव डाळ गावाच्या हद्दीतून सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. पोलिसांना ५ आरोपींपैकी २ जणांना अटक करण्यात यश आलं आहे. तर इतर तिघांनी गाडीतून उतरून परिसरातील डोंगराच्या दिशेने पळ काढला. तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी सकाळी एका सराफाच्या दुकानात पाच आरोपींनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. मात्र नागरिक आल्याने त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांनी त्याठिकाणहून पलायन केले होते. पाचही आरोपी एका इन्होव्हा मोटारीतून भोरकडे आल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी भोर पोलिसांना दिली. यानंतर भोर पोलिसांनी पाठलाग करून दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हदीतील गुरुवारी सकाळी एका सराफाच्या दुकानात पाच आरोपींनी दरोड्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील नागरिकांना दरोडेखोरांच्या कृत्याचा सुगावा लागला. स्थानिक नागरिक दरोडेखोरांच्या दिशेला धावली. त्यामुळे दरोडेखोरांनी घटनास्थळाहून धूम ठोकली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस तपास करत असताना त्यांना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाचही आरोपी एका इन्होव्हा मोटारीतून भोरकडे आल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी भोर पोलिसांना दिली. भोरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता सहकाऱ्यांसमवेत शहरात नाकाबंदी करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी पाच प्रवासी असलेली एक इनोव्हा मोटार (क्र. एम.एच. १२ ए.पी. ७७७३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाडच्या बाजूकडे जाताना दिसली. पोलिसांची गाडी दिसताच त्या मोटारीने यू टर्न घेऊन शिरवळ बाजूकडे गेली. पोलिसांना लगेचच त्या मोटारीचा पाठलाग सुरु केला. चार-पाच मिनिटातच पाच किलोमीटर अंतर पार केल्यावर वडगाव डाळ गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपासमोर पोलिसांनी त्या मोटारीस ओव्हरटेक करून मोटार थांबवली. पोलीस गाडीतून उतरेपर्यंत मोटारीतील पाचही जण डोंगराकडे पळून जाऊ लागले. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरु केला. पाच जणांपैकी प्रेम सोनवणे हा पोलिसांच्या हाती लागला. मात्र उर्वरित चार जण पळून गेले. पोलिसांनी प्रेम यास ताब्यात घेऊन शासकीय कार्यवाही करून त्यास तळेगाव पोलिसांकडे सुपूर्द करण्यासाठी पुण्याला घेऊन गेले. तोपर्यंत तासाभरात वडगावच्या तरुणांनी डोगरामध्ये शोध सुरु केला होता. त्यावेळी त्यांना अमित नावाचा आरोपी मिळाला. त्यासही तळेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याची माहिती मिळताच भोरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी सहकाऱ्यांसमवेत अर्ध्या तासात या आरोपींना पकडले. त्यांच्या मोटारीतून दरोड्यासाठी लागणारे साहित्यही ताब्यात घेतले. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शैला खोत, चालक हेमंत भिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार नवले, पोलीस हवालदार दत्तात्रेय खेगरे, सुनील चव्हाण, अभय बर्गे, अविनाश निगडे आणि सोनाली इंगुळकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon