धाराशिवमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, महिलेचा हात ओढून आय लव्ह यु म्हणत किस घेण्याचा प्रयत्न

Spread the love

धाराशिवमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, महिलेचा हात ओढून आय लव्ह यु म्हणत किस घेण्याचा प्रयत्न

पोलीस महानगर नेटवर्क

भूम – कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसावर भक्षक होण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना प्रकट होत आहे.भूममध्ये अशीच एक घटना घडली आहे. बीड माहेर आणि छत्रपती संभाजीनगर सासर असलेल्या एका महिलेला मैत्रिणीच्या माध्यमातून भूम शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या घरामध्ये बोलावून, बेडरूममध्ये सोबत झोपण्याची इच्छा व्यक्त करून नंतर दुसऱ्या दिवशी आय लव्ह यु म्हणत जवळ ओढून किस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र लिंबाजी शिंदे असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या ३८ वर्षीय फिर्यादी महिलेचे माहेर बीड आहे. बीडमधील एका मैत्रिणीने या फिर्यादी महिलेशी संपर्क साधून तिला गोड बोलून कारने भूममध्ये नेले , तिथं गेल्यावर तिला समजले की, वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे हे तिचे खास मित्र आहेत. तिच्या माध्यमातून महिलांवर जाळे टाकून प्रेमसंबंध निर्माण करून शारीरिक उपभोग करीत असल्याची माहिती मिळाली. काही दिवसापूर्वी भूम शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या घरामध्ये फिर्यादी महिलेस बोलावून, तिच्या मैत्रिणीने सपोनि रवींद्र लिंबाजी शिंदे यांच्यासोबत रात्री बेडरूममध्ये झोपण्याचे बोलून दाखवले असता, फिर्यादी महिलेने नकार दिला. त्यानंतर सकाळी किचनमध्ये असताना, सपोनि रवींद्र लिंबाजी शिंदे हे पाणी पिण्याच्या बहाण्याने मागून येऊन तिचा हात पकडला आणि आय लव्ह यु म्हणत किस घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करीत फिर्यादी महिलेने तेथून काढता पाय घेतला. हा प्रकार ५ जून २०२४ रोजी घडला असून, गुन्हा २२ जून रोजी दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे, त्याची मैत्रिण सुनीता गोविंद मस्के आणि चालक प्रदीप या तिघांवर भूम पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ३५४, ३५४ ( A ) , ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असताना, हे गुलाबी लफडे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हा उशिरा दाखल झाल्याने आजवर कुणाचा दबाव होता, याची चवीने सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon